
समर्थ सहकारी साखर कारखाना लिमिटेड, अंकुशनगर
मराठवाडयाचा सर्वांगीण कायापालट करणारे जायकवाडी धरण तयार झाल्यानंतर त्याचा
फायदामराठवाडयातील अनेक जिल्हयांना मिळू लागला त्याचप्रमाणे जालना जिल्हयातील काही भागात विशेषतः तत्कालीन अंबड तालुक्यातील शेतीला हे पाणी मोठया प्रमाणावर मिळू लागले शेतकरी बांधवांनी याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने ऊसाची लागवड मोठया प्रमाणावर सुरु केली अंबड तालुक्यात ऊसाखालील क्षेत्र मोठया प्रमाणावर वाढीस लागले त्यावेळी जालना जिल्हयामध्ये एकही साखर कारखाना नसल्याने शेतकरी बांधवांना ऊसाचा गुळ करण्याशिवाय किंवा उभा ऊस शेजारचे जिल्हयातील कारखान्यांना त्यांचे इच्छेप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस पुरवठा करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाचा योग्य मोबदला मिळणे अवघड होत असे
फायदामराठवाडयातील अनेक जिल्हयांना मिळू लागला त्याचप्रमाणे जालना जिल्हयातील काही भागात विशेषतः तत्कालीन अंबड तालुक्यातील शेतीला हे पाणी मोठया प्रमाणावर मिळू लागले शेतकरी बांधवांनी याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने ऊसाची लागवड मोठया प्रमाणावर सुरु केली अंबड तालुक्यात ऊसाखालील क्षेत्र मोठया प्रमाणावर वाढीस लागले त्यावेळी जालना जिल्हयामध्ये एकही साखर कारखाना नसल्याने शेतकरी बांधवांना ऊसाचा गुळ करण्याशिवाय किंवा उभा ऊस शेजारचे जिल्हयातील कारखान्यांना त्यांचे इच्छेप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस पुरवठा करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाचा योग्य मोबदला मिळणे अवघड होत असे
जिल्हयातील विशेषतः अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसाचा योग्य मोबदला मिळण्याच्या दृष्टीने व परिसराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने अत्यंत परिश्रम व कष्ट घेऊन मा श्री अंकुशरावजी टोपे साहेब यांनी जालना जिल्हयामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना ”समर्थ सहकारी साखर कारखाना लि ,” या नावाने काढण्याचे ठरविले यासाठी त्यांनी लायसन्स मिळणे म्हणून दिनांक ३१-१०-१९८० रोजी अर्ज दिला त्यांचे प्रयत्नास यश येवून भारत सरकार, नवी दिल्ली यांनी दिनांक ३१-१२-१९८१ रोजी कारखाना स्थापनेसाठी आवश्यक असलेले ”लेटर ऑफ इन्टेट” देऊन मंजुरी दिली ”लेटर ऑफ इन्टेट” प्रदान समारंभ तत्कालीन भारत सरकारचे नियोजन मंत्री मा ना श्री शंकररावजी चव्हाण यांचे शुभहस्ते दिनांक २९-१-८२ रोजी संपन्न झाला यानंतर तालुक्यामध्ये कारखाना उभारणीचे दृष्टीने अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाले श्री अंकुशरावजी टोपे व त्यांचे सहकार्यांनी भाग भांडवल जमा करणेसाठी तालुक्याचा झंझावती दौरा केला यास अति उत्साहीपणाने प्रचंड प्रतिसाद मिळाला व आवश्यक ते भागभांडवल जमा होत गेले. दिनांक १०-२-१९८२ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० खाली कारखान्याची रितसर नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्यात आली नोंदणीनंतर मा साखर सहसंचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक २-३-१९८२ रोजी पहिल्या संचालक मंडळाची नियुक्ती केली संचालक मंडळाचे नियुक्तीनंतर दिनांक १०-५-१९८२ रोजी मा जिल्हाधिकारी,जालना यांचे अध्यक्षतेखाली मिटींग होऊन त्यामध्ये मा श्री अंकुशरावजी टोपे यांची अध्यक्षपदी तर मा श्री बाबासाहेब पाटील याची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यानंतर कारखाना उभारणीचे प्रक्रीयेला अत्यंत द्रुत गती प्राप्त झाली साईट सिलेक्शन कमिटीने सर्व बाबींचा विचार करुन कारखान्यासाठी महाकाळा येथील साईट निश्चीत केली त्यासाठी कारखान्याचे मा संचालक मंडळाने ४०३ एकर जमीन घेण्याचे निश्चीत करुन जमीन खरेदी करुन ताब्यात घेतली कारखाना उभारणी कामी आवश्यक असणाऱ्या मशिनरीची ऑर्डर महाराष्ट्र शासनाच्या सल्याने मे रिचर्डसन अॅण्ड क्रुडास लि ,मुंबई यांना देण्याबाबत दिनांक १३-७-१९८२ रोजी रितसर करार करण्यात आला कारखाना उभारणीचे एकमेव ध्येय समोर ठेवून संचालक मंडळाने अथक परिश्रम, कष्ट व जोरावर ६० ०० लाख भाग भांडवल गोळा केले तसेच सरकारी भाग भांडवल १९८ २३ लाख महाराष्ट्र सरकारकडून मिळाले तसेच वित्तीय संस्था आय एफ सी आय , आय डी बी आय , आय सी आय सी आय , नवी दिल्ली यांचेकडून कारखान्यास ४२५ ०० लाख दिर्घ मुदतीचे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि ,मुंबई यांचेकडून रु १०० ०० लाख मध्यम मुदतीचे कर्ज मंजुर केले यामुळे आर्थिकप्रश्न सुटण्यास मदत होऊन कारखाना उभारणी प्रक्रीयेला वेग मिळाला कारखान्याचे सिव्हील बांधकामाचा शुभारंभ दिनांक २१-११-१९८२ रोजी तत्कालीन माजी सहकार मंत्री बाबुरावजी काळे यांचे व माणिकराव भांबळे, माजी सिंचन राज्यमंत्री यांचे उपस्थितीत संपन्न झाला दिनांक २१-५-१९८३ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा ना श्री वसंतदादा पाटील यांचे शुभहस्ते ‘मुख्य प्रशासकीय इमारत कोनशिला’ समारंभ संपन्न झाला यानंतर पुढे टप्याटप्याने कारखान्याची प्रगती होत गेली.
संस्थापक अध्यक्ष – कै अंकुशरावजी टोपे (माजी खासदार)
मार्गदर्शक – नामदार राजेश अंकुशरावजी टोपे
उपाध्यक्ष – मा श्री उत्तमराव काशिनाथराव पवार
कार्यकारी संचालक – श्री दिलीप शिवदास पाटील
व्यवस्थापकीय संचालक – श्री बाजीराव तुकाराम पावसे
समर्थ साखर कारखाना –
स्थापना वर्ष – १९८२
मशिनरी उभारणीस सुरुवात – सन १९८२-८३, १९८३-८४ चाचणी १९८४-८५
प्लॅन्ट – वालचंदनगर, रिचर्डसन अॅण्ड क्रुडास
गाळप क्षमता स्थापीत – १२५० मे टन प्रतिदिन
गाळप क्षमता विस्तारीकरण सुरुवात (१९८९-९०-१९९०-९१) विस्तारीकरण पुर्णः१९९३-९४
विस्तारीत गाळप क्षमता – २५०० मे टन प्रतिदिन