Businesses owned
Happy Clients
Years in the market
माजी मंत्री राजेशभैय्या टोपे साहेब यांना ”साखर उद्योग गौरव पुरस्कार” प्रदान
पुणे येथे ‘द डेक्कन शुगर टॅक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया (DSTA) तर्फे साखर उद्योग, तंत्रज्ञान आणि औद्योगीक, सहकार क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठेचा ”साखर उद्योग गौरव पुरस्कार” कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांना माजी मंत्री मा.जयंत पाटील साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
कारखान्याच्या माध्यमातून मिळालेला हा मानाचा पुरस्कार कारखान्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान असल्याची भावना माजी मंत्री राजेशभैय्या टोपे साहेब यांनी व्यक्त केली.राजेशभैय्या टोपे साहेब हे साखर उद्योगातील एक अभ्यासू नेतृत्व असून साखर कारखान्यांच्या प्रश्नांसंदर्भात नेहमी अग्रेसर असतात. या पुरस्काराने त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे.
या पुरस्काराबद्दल कारखान्याचे सभासद, अध्यक्षा, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक, खाते-विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोड वाहतुक कंत्राटदार, मजुर व हितचिंतक यांनी त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी राज्याचे साखर आयुक्त डाॅ.संजय कोलते, द वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे, द शुगर टेक्नाॅलाॅजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय अवस्थी, द साऊथ इंडियन शुगरकेन ॲण्ड शुगर टेक्नाॅलाॅजिस्टस् असोसिएशनचे अध्यक्ष आर.व्ही.कुंभार, द डेक्कन शुगर टेक्नाॅलाॅजिस्टस् असोसिएशनचे अध्यक्ष सोहन शिरगांवकर, उपाध्यख एस.डी.बोखारे, पुरस्कार प्राप्त मानकरी, साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
