सभासद अपघात विमा योजना :-
सभासद साखर वाटपः-
ऊस विकास योजने अंतर्गत विविध योजना :-
गांडुळ खत प्रकल्प:-
कर्मयोगी अंकुशराव टोपे सर्वाधिक ऊस तोड व वाहतुक गौरव पुरस्कार :-
ऊस तोडणी व वाहतुक मजुर विमा :- आपले कारखान्याकडून नियमीत ऊस तोड व वाहतुक यंत्रणेचा विमा उतरविला जातो़ गळीत हंगाम२०२१-२२ मध्ये मा. श्री. विखे पाटील विमा योजने अंतर्गत ऊस तोडणी व वाहतुक मजुरांचा अपघाती विमा उतरविला असून अहवाल सालात १३६ मजुरांना रु़ २७,७०,५४६/- सामुहिक विमा योजनेतून रक्कम मिळवून देऊन त्यांचे कुंटूबियास सहकार्य आहे़ तसेच अपघातामध्ये बैल/मजुर मयत होणे, बैल निकामी होणे, कोपी जळणे अथवा अन्य कारणामुळे नुकसान झालेल्या मजुरास सामुहिक विमा योजनेतून रक्कम मिळवून देऊन सहकार्य करीत आहोत़
वृक्षारोपन व संगोपन :- समृध्द पर्यावरणाचे संरक्षण होणेसाठी आपले कारखान्याने युनिट नं. १ अंकुशराव येथे ३३३३३ व युनिट नं. २ (सागर) तिर्थपुरी येथे ५३११० अशी एकुण ८६४४३ झाडे लावली आहेत़ यामध्ये करंज, काशिद, सिसम, रेन ट्री, लिंब, कांचन, चिंच, आंबा, नारळ, पेरु, सिताफळ अशी जंगली वृक्ष व फळबाग वृक्ष लागवडी बरोबरच विविध शोभिवंत वृक्षांचा समावेश आहे़ पर्जन्य वर्ष २०२२ मध्ये युनिट नं. १ अंकुशराव येथे १२७६ व युनिट नं. २ (सागर) तिर्थपुरी येथे -३७०० अशी एकुण दोन्ही युनिटकडे ४९७६ नवीन फळबाग, जंगली व शोभिवंत झाडे लावण्याचे काम सुरु आहे़ लावलेली झाडे पुर्ण जगली पाहिजेत यासाठी झाडांना ठिबक सिंचन व तुषार सिंचन केले आहे़ सभासद शेतकर्यांनी वृक्ष लागवड योजनेमध्ये सहभागी होऊन आपापल्या शेतात उपयोगी फळबाग वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करावे, असे मी आवाहन करीत आहे़
संगणक विभाग :-
(संगणक प्रणाली) गळीत हंगाम २०२०-२१ पासून वापरात येत आहे़ सदरची ईआरपी सॉफ्टवेअर प्रणाली ही क्लाउड बेस असल्याने इंटरनेटद्वारे याचे कामकाजकेले जाते़ यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोड व वाहतुक मुकादम यांना ऊस टनेजची माहिती एसएमएसद्वारे मिळते़ ऊस तोडणी प्रोग्रामसाठी ऑन लाईन मोबाईल अप व वजन काटा प्रणाली चालू केलीआहे़ यामध्ये कोणासही ऊस नोंद अगर अन्य तपशिलामध्ये फेरबदल करता येत नाही़ तसेच वायरलेस कनेवस्र्टीव्हीटीचा वापर करुन कारखान्याचे युनिट नं. २ (सागर) तिर्थपुरीकडील संगणकीय डाटा युनिट नं. १ अंकुशनगरचे सर्व्हरला सेट्रलाईज केला आहे़ कामकाजाच्या सोईचे दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा व व्हीडीओ कॉन्फरन्सींग सिस्टीम बसविली आहे़
कामगार संबंध व कामगार कल्याण योजना :- कारखान्याचे कामकाजामध्ये कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार यांचे सहकार्य मिळत असून त्यांचा आपल्या कारखान्याच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा आहे़ सर्वजन आपुलकीने व निष्ठेने काम करतात़ कामगार हा कारखान्याचा एक महत्वाचा घटक समजून कामगार व त्यांच्या कुंटूबियांच्या सेवेकरीता कारखाना कार्यस्थळावर उत्तम दर्जाची घरे,पिण्याचे शुध्द पाण्यासाठी आऱ ओ़ प्लॅन्ट, पिठाची गिरणी, सांस्वृत्र्तीक व क्रीडा मंडळ, कामगार कल्याण मंडळ, भजनी मंडळ, सहकारी कामगार पतपेढी, गणो उद्यान, बालोद्यान, इत्यादी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत़ प्रत्येक वर्षी कामगारांना बोनस, सानुग्रह अनुदान, गणवेष दिले जातात़ तसेच कर्मचारी ग्रुप ग्रॅच्यईटी स्कीम, कर्मचारी ग्रुप पर्सनल अॅक्सीडेंट बेनिफीट पॉलीसी, कर्मचारी ग्रुप लिव्ह इन-वॅत्र-मेंट पॉलीसी, ववर्स्र्समन कॉम्पेन्सेशन पॉलिसी इत्यादी विविध पॉलीसीज घेतल्या आहेत़ यामुळे ग्रच्युईटी, रजेचा पगार , अपघात झाला तर अर्थसहाय्य मिळणे सुलभ झाले आहे़ तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचेवतीने गरजू व पात्र कर्मचार्यांच्या मुला-मुलीना शैक्षणिक शिष्यवृत्ती, त्यांच्या कुंटूबियांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यात येते़