
Welcome to
समर्थ सहकारी साखर
कारखाना लिमिटेड, अंकुशनगर
कारखाना लिमिटेड, अंकुशनगर
महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० खाली कारखान्याची रितसर नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्यात आली नोंदणीनंतर मा साखर सहसंचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक २-३-१९८२ रोजी पहिल्या संचालक मंडळाची नियुक्ती केली संचालक मंडळाचे नियुक्तीनंतर दिनांक १०-५-१९८२ रोजी मा जिल्हाधिकारी,जालना यांचे अध्यक्षतेखाली मिटींग होऊन त्यामध्ये मा श्री अंकुशरावजी टोपे यांची अध्यक्षपदी तर मा श्री बाबासाहेब पाटील याची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यानंतर कारखाना उभारणीचे प्रक्रीयेला अत्यंत द्रुत गती प्राप्त झाली साईट सिलेक्शन कमिटीने सर्व बाबींचा विचार करुन कारखान्यासाठी महाकाळा येथील साईट निश्चीत केली त्यासाठी कारखान्याचे मा संचालक मंडळाने ४०३ एकर जमीन घेण्याचे निश्चीत करुन जमीन खरेदी करुन ताब्यात घेतली कारखाना
कारखाना उभारणी कामी आवश्यक असणाऱ्या मशिनरीची ऑर्डर महाराष्ट्र शासनाच्या सल्याने मे रिचर्डसन ॲण्ड क्रुडास लि ,मुंबई यांना देण्याबाबत दिनांक १३-७-१९८२ रोजी रितसर करार करण्यात आला
कारखाना उभारणी कामी आवश्यक असणाऱ्या मशिनरीची ऑर्डर महाराष्ट्र शासनाच्या सल्याने मे रिचर्डसन ॲण्ड क्रुडास लि ,मुंबई यांना देण्याबाबत दिनांक १३-७-१९८२ रोजी रितसर करार करण्यात आला
Samarth Sahakari Sakhar karkhana LTD
Chairman & Managing Director Message
मराठवाडयाचा सर्वागीण कायापालट करणारे जायकवाडी धरण तयार झाल्यानंतर त्याचा फायदामराठवाडयातील अनेक जिल्हयांना मिळू लागला त्याचप्रमाणे जालना जिल्हयातील काही भागात विशेषतः तत्कालीन अंबड तालुक्यातील शेतीला हे पाणी मोठया प्रमाणावर मिळू लागले शेतकरी बांधवांनी याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने ऊसाची लागवड मोठया प्रमाणावर सुरु केली अंबड तालुक्यात ऊसाखालील क्षेत्र मोठया प्रमाणावर वाढीस लागले त्यावेळी जालना जिल्हयामध्ये एकही साखर कारखाना नसल्याने शेतकरी बांधवांना ऊसाचा गुळ करण्याशिवाय किंवा उभा ऊस शेजारचे जिल्हयातील कारखान्यांना त्यांचे इच्छेप्रमाणे शेतकाराऱ्यांना ऊस पुरवठा करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हाता त्यामुळे शेतकाराऱ्यांना ऊसाचा योग्य मोबदला मिळणे अवघड होत असे जिल्हयातील विशेषतः अंबड तालुक्यातील शेतकाराऱ्यांना ऊसाचा योग्य मोबदला मिळण्याच्या दृष्टीने व परिसराचा सर्वागीण विकास होण्याच्या दृष्टीने अत्यंत परिश्रम व कष्ट घेऊन मा श्री अंकुशरावजी टोपे साहेब यांनी जालना जिल्हयामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना ”समर्थ सहकारी साखर कारखाना लि ,” या नावाने काढण्याचे ठरविले